Maitri Shala, Jarida Extension Read Details       Read a story / Tell a Story to Melghat children Read Details 


Maitri against Corona

All Projects


एखाद्या नैसर्गिक आपत्तीपेक्षाही अधिक भयंकर आपत्ती कोरोनाच्या रूपाने आपल्यासमोर येवून उभी आहे. सर्व जगाला वेढून टाकणा-या या समस्येशी लढण्यासाठी मैत्री ने तयारी केली आहे. सुरुवातीला लोकांमध्ये प्रबोधनाच्या करण्यामध्ये आपण सरकारी पातळ्यांवर जे काम चालू होते त्यात हातभार लावला. 

आता आपण मदतीच्या पुढच्या टप्प्यावर आहोत. टाळेबंदीच्या परिस्थितीमुळे अनेक जणांचा रोजगार बुडतोय, आणि ज्यांचे हातावर पोट आहे अशा अनेक जणांना उपाशी दिवस काढावे लागत आहेत अशा लोकांना शिधा देण्यासाठी, जगण्याची लढाई चालू ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. 

आवाहन क्र. १

जत शहराच्या बाहेर चार किलोमीटरवर पाल टाकून राहिलेले हे 57 लोकांचे कुटुंब आहे यामध्‍ये 13 कुटुंबीय, आणि पंधरा मुली आणि 17 मुले आहेत. मूळचे राजस्थान, डोह येथील रहिवासी असून डोंबारी काम व औषध विक्री हा त्यांचा व्यवसाय आहे.  अजून यांना कसलीही मदत मिळाली नाही.

या लोकांना १५ दिवसाचे राशन द्यायचं आहे, त्यासाठी आपल्याला निधी हवा आहे. प्रत्येक कुटुंबाला खालील यादीप्रमाणे १५ दिवसाचे साहित्य याचा खर्च प्रत्येकी रु. ८५० आहे.

आवाहन क्र. २

हत्तीद, ता. सांगोला, जिल्हा सोलापूर हे ४७६४ लोकसंख्या, ७८९ कुटूंब असलेलं गाव. गावातल्या ३० कुटूंबांना अशाच मदतीची गरज आहे. यात विधवा, परित्यक्ता महिला व वृध्द, निराधार कुटूंब आहेत.

आवाहन क्र. ३

जत चे यल्लमा देऊळ प्रसिद्ध आहे. देवळात दर्शनासाठी येणारे भाविक इथल्या देवदासींना भिक्षुकी देत असतात. पण सध्या देऊळ बंद आहे. परिणामी या देवदासींवर भुकेलं रहायची वेळ आली आहे.

या ४५ जणी जवळच्या देवदासी वस्तीत राहतात. त्यांना अजून कुठलाही मदत मिळालेली नाही.

यापैकी काही देवदासींना मुलेही आहेत. या सर्वांना राशन किट द्यायचं आहे. प्रत्येकी रु. ८५०/-. देवदासींशी बोलून गरजेनूसार या किटमध्ये बदल होईल आणि २० दिवस पुरेल असं धान्य दिलं जाईल.

आवाहन क्र. ४

जत शहरातच राहणारे काही मदारी लोक. एकूण 34 कुटुंब, ज्यात 55 मुले आणि 52 मुली आहेत. सापाचे व माकडाचे खेळ दाखवून हे पोट भरतात. सध्या त्यांना काही काम नाही. त्यांना १५ दिवसाचे राशन द्यायचे आहे.

आवाहन क्र. ५

टाळेबंदी उठल्यावर..

टाळेबंदीमुळे अनेकांचे रोजगार बुडत आहेत. हातगाडीवाले, पथारीवाले, छोटे व्यावसायीक, इ. अशा लोकांना टाळेबंदी उठल्यावर आपले व्यवसाय परत सुरू करता यावे म्हणून अगदी किरकोळ भांडवल लागेल. पुण्यातल्या दांडेकर पुलाजवळ राहणाऱ्या अशा काही लोकांशी मैत्री संपर्कात आहे. हे सूक्ष्म भांडवल, रु. १००० ते रु. ५००० पर्यंत, तुमच्या मदतीने टाळेबंदी उठल्यावर “मैत्री” त्यांना देईल. प्रत्येकाच्या व्यवसायानूसार या भांडवलाची नेमकी रक्कम ठरेल.

 

मैत्री आपणास आवाहन करीत आहे की तुम्हाला शक्य असेल तेवढा निधी या कामासाठी द्यावा. 

View Activities

Photos

Project Documents
Videos


Project Location

Donate

The support from friends like you gives us a strength and keeps us going

Cheques can be given in the name of MAITRI

Donations to MAITRI are exempt under sec 80(G) of the Income Tax Act of Govt. of India

Please provide Name, PAN No, Mobile number & emailid when you donate online.


For online donations to MAITRI Click to donate Online in Indian Currency

(Indian Source)

HDFC Bank, Mayur Colony, Kothrud, Pune.
Account number- 01491450000152.
IFSC: HDFC0000149


(Foreign Source)
Individuals holding foreign passport and/or companies, organisations, trusts, foundations incorporated in a foreign country  Click to donate Online in Foreign Currency

Name of the beneficiary : MAITRI

Bank : State Bank of India. New Delhi Main Branch.
         11 Sansad Marg. New Delhi 110001. India

Beneficiary account number : 40166623586

SWIFT Code :  SBININBB104         IFSC : SBIN0000691

Purpose code : P1303

(Donor to mention the purpose code as "P1303" in the payment instruction when the transfer is effected) 


 MAITRI is a trust registered under the Public Trusts Act (# E 2898). 

Please provide Name, PAN No, Mobile number & emailid when you donate online.


Statutory Documents



Want to join as Volunteer?

Registered Address:
'Kalyan', 32, Natraj Society,
Karve Nagar,
Pune 411038
Office Address:
Flat No. 9, Mahadev Smruti,
Near Balshikshan School, Mayur Colony,
Kothrud, Pune 411038
 

Phone: 9309930010 

Email :  maitri1997@gmail.com

© 2024 Copyright Maitri Pune. All Rights Reserved. Designed by aplap software